ll केल्याने होत आहे रे,
आधी केलेची पाहिजे ll

* संस्थेला दिलेल्या देणगीसाठी , ८०G अंतर्गत टॅक्स बेनेफिट/ कर लाभ सुविधा उपलब्ध आहे Click Here to Donate !   *अल्पारंभा ऑनलाईन लर्निंग कोर्सेस Click Here   *अल्पारंभा ट्रेनिंग/ प्रशिक्षण प्रोग्रॅम्स Click Here

अर्थ साक्षरता आयाम

देशातील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण केवळ २३% आहे. ही देशाच्या प्रगतीच्या मार्गात अडसर ठरणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच सामाजिक अर्थ साक्षरता वृद्धिंगत व्हावी, यासाठी अल्पारंभा द्वारे सतत विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये "अर्थ साक्षरता क्लब" ची स्थापना करणे, आर्थिक साक्षरता विषयावर मार्गदर्शनपर सत्रे, उपक्रम घेणे, अर्थ साक्षरतेवर आधारित साहित्य प्रसिद्ध करणे (ब्लू बूक, मनोमनी,गवाक्ष) आणि प्रकाशन अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून, आर्थिकदृष्ट्या अधिक जागरूक, साक्षर असणाऱ्या पिढीचे निर्माणकार्य सुरु आहे. "आर्थिक साक्षरता क्लब" च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना "आर्थिक सल्ला, व्यवसाय वाटा" या विषयावरही मार्गदर्शन करण्यात येते.या अंतर्गत, महाराष्ट्रात १५+ महाविद्यालयांमध्ये आर्थिक साक्षरता क्लबची सुरुवात झालेली आहे.

Click :आर्थिक साक्षरता विषयावर घेतलेली सत्रे

सध्या सुरु असणारे उपक्रम


  • आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार: नासिक शहर आणि परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांमध्ये, "आर्थिक साक्षरता क्लब / परिसंवाद " यांचे आयोजन करणे आणि त्याद्वारे तेथील विद्यार्थी / अधिकारी / कामगार वर्गाचे याविषया अंतर्गत प्रबोधन करणे.

    यामध्ये पुढील विषयां अंतर्गत सत्रे घेतली जातात .

"Financial Literacy: Awareness & Education: आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार"

Click इंग्रजी व्हिडिओ   Why To have a Inhouse Financial Literacy Club at My Organization?

Click मराठी व्हिडिओ    माझ्या संस्थेत "आर्थिक साक्षरता क्लब" गरजेचा का आहे ?

  1. Financial Literacy: Me & My Family : अर्थ साक्षरता ! मी आणि माझे कुटुंब
  2. Financial Literacy for Women: स्त्री अर्थ साक्षर तर कुटुंब अर्थ साक्षर (महिलांसाठी विशेष व्याख्यान )
  3. Financial Planning: आर्थिक नियोजन
  4. Blue Book : A Tool for Recording the Financial Facts : ब्लू बूक : महत्व आर्थिक दस्तावेज नोंदणीचे
  5. Succession Planning: वारसाहक्क आणि नियोजन
  6. Crafting Your Will: इच्छापत्र आणि नियोजन
  7. Insurance for Family: आरोग्य, अपघात आणि जीव विमा
  8. Tax Planning: टॅक्स प्लांनिंग
  9. The Investment Mantra: मंत्र गुंतवुकीचा
  10. Investor Psychology: गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र
  11. Financial Advisor: Your Friend: आर्थिक सल्लगार : तुमचा मित्र


या सत्र आयोजनासाठी संपर्क : डॉ. रुपाली कुलकर्णी, ९०११८९६६८१ / alparambha@gmail.com


जाता जाता...


आपली आर्थिक साक्षरता वृद्धिंगत करण्यासाठी/ पडताळण्यासाठी पुढील चेकलिस्ट देत आहे. ती स्वतःसाठी पडताळून पहा आणि त्यातील संदर्भांची माहिती करून घ्या!

  • मला सर्वसामान्यांसाठी सरकार पुरस्कृत ज्या विविध आर्थिक योजना आहेत त्यांची पूर्ण माहिती आहे का?
  • मी आर्थिक सर्व-समावेशकतेसाठी सरकार तर्फे जाहीर करण्यात आलेल्या उपयुक्त आर्थिक योजनांमध्ये सहभागी आहे का ? (उदा. पंतप्रधान जीवन सुरक्षा , जीवन ज्योती योजना इ.)
  • मला नामांकनाची संकल्पना, तिचे महत्व माहीत आहे का? माझ्या सर्व बचत / गुंतवणुक खात्यांना नामांकन केलेले आहे का?
  • माझे पॅन कार्ड, आधार कार्ड यावरील माहिती अचूक आणि अद्ययावत आहे का?
  • मला सोप्या आर्थिक संकल्पना आणि त्यांचे फायदे/ तोटे माहिती आहेत का? (उदा. इन्फ्लेशन/महागाई आणि त्याचे परिणाम, आर्थिक गुंतवणुकीचे विविध पर्याय जसे म्युचुअल फंड्स, इ).
  • मला विम्याचे महत्व, प्रकार, फायदे ठाऊक आहेत का? माझ्या सर्व कुटुंबियासाठी अशा उपाययोजना केलेल्या आहेत किवा नाही याची मला माहिती आहे का ? (उदा. जीवन / आरोग्य / अपघात विमा इ).
  • मला माझ्या घरातील सर्व आर्थिक गुंतवणुकीचा लेखा-जोखा ज्ञात आहे का? त्यासाठी घरातील सर्व आर्थिक व्यवहारांची, निर्णयांची नोंद मी ठेवते / ठेवतो का ?
  • मी वर्तमानपत्रातील आर्थिक-क्षेत्रातील बातम्या, पुरवणी वाचते / वाचतो का? आर्थिक-क्षेत्राशी निगडीत पुस्तके, ब्लॉग, कार्यक्रम यांचा वापर, मी माझ्या ज्ञानवृद्धी साठी करते / करतो का?

    करा विचार, करा अंमल ! जागवा स्वतःचे, समाजाचे, देशाचे अर्थभान !!

    फौंडेशनच्या आर्थिक साक्षरता अभियानात सहभागी होण्यासाठी तुम्हीही पुढीलप्रमाणे योगदान देऊ शकता: तुमच्या कार्यालयात/महाविद्यलयात/ शाळेत/ परिसरात विविध उपक्रम चालविणारा "अर्थ साक्षरता क्लब " याची स्थापना / "आर्थिक साक्षरता" या विषयावर व्याख्यान/परिसंवाद यांचे आयोजन करणे.

    अधिक माहिती: डॉ. रुपाली कुलकर्णी, ९०११८९६६८१ / alparambha@gmail.com

    क्षणचित्रे


>